Wednesday, 19 October 2011

आयुष्यावर बोलू काही


प्रिय सलील- संदीप यांस,

दोन वर्षांपूर्वी मला एका मित्राने तुमच्या 'नामंजूर' ह्या अल्बम ची सीडी दिली तेव्हा मी ती अशीच ठेऊन दिली. तेव्हा पासून मी तुम्हा दोघांचं नाव एकूण होतो. त्यानंतर गेल्या वर्षी एका मैत्रिणिने मला तुमची दोन गाणी दिली आणि म्हणाली आत्ता एक,
ती दोन गाणी होती,
'दूरदेशी गेला बाबा' आणि 'एका दमलेल्या बाबाची  कहाणी'.
एका पाठोपाठ जेव्हा मी ही गाणी एकली तेव्हा मलाही गहीवरुन आलं. मुलाला सर्व काही भेटावं म्हणून   दिवस - रात्र कष्ट करणारा बाप अन् आई - वडिलांसोबत काही क्षण मिळवण्यासाठी धडपणारी आजची मुलं. दोघांच्याही भूमिका उत्कृष्ठ पणे  मांडण्यात आल्या आहेत.
त्यानंतर मी तुमची काही गाणी जमा केली. तुमचा प्रोग्रॅम कधी अटेंड करता येतो का ते मी शोधायचो पण कॉलेज मधे असल्यामुळे वेळ कधी मिळालाच नाही. इंटरनेट  अन्  z मराठी वर काही वीडियो बघितले तेव्हा मला जास्त आकर्षण वाटले पण पूर्ण कार्यक्रम कधी  पहिला नाही.

तो योग आला, 15 ऑक्टोबर 2011 ला .मला जेव्हा कळालं की वाशीला तुमचा शो आहे, लगेच मी फोन करून चौकशी केली. माझे मित्र पण तुमचे फॅन आहेत म्हणून मी काही जणांना SMS केला पण सर्व जन आपल्या कामात busy होते तरी एक मित्र लगेच तयार झाला.मला तर काही प्रॉब्लेम नव्हता आणि ह्या वर्षी कामाला लागल्यामुळे आई वडिलांकडे ही पैसे मागायची गरज नव्हती.

मी जेव्हा दोन टिकिट बुक करून आलो तेव्हा घरी संगितल त्यावर आई म्हणाली,"मी पण आले असते पण माझी भरपूर कामं आहेत." मग मी विचार केला की का नाही आई - पप्पा दोघांना जावूया??? मी पुन्हा जाउन अजुन दोन टिकिट बुक केले. आई वडिलांसोबत बाहेर कुठे कार्यक्रमाला जाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. THANKS TO YOU. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. त्या दोन - अडीच तासात तुम्ही पाउस बालगीते ,प्रेमगीते सर्वच विषयांना तुम्ही हात घातला. मी मधे - मधे आई वडिलांकडे नजर टाकायचो पण खरच त्यांनी खूप एन्जॉय केला. कविते अगोदर तुम्ही दिलेल्या प्रस्तावना देखील एक वेगळचं विश्व निर्माण करतात. भरपूर नवीन गाणी-कविता  तुम्ही सादर केल्या. विशेष म्हणजे "स्पाइडर मन ची बायको" अन् सफरचंद ह्या कविता  जरा जास्त आवडल्या. शेवटी ITEM SONG सादर करून तुम्ही तर धक्काच दिला. तुम्ही जो तुमच्या पुस्तकातील किस्सा वाचून दाखवला तो पण खुपच छान होता, पण तेव्हा संदीप खरेंना काय झालं होत काय माहीत? तुम्ही इकडे वाचन करताय अन् तिकडे ते खुदु खुदु हसताय. असो..ती गंमत तुमच्या दोघांची..

नेहमी मला प्रश्न पडायचा की तुम्हा दोघांमधे जास्त सरस कोण?
एक जो कविता करणारा की जो त्यांना चाल देऊन सादर करणारा. तेव्हा माझा कल संदीप खरेंकडे असायचं कारण त्यांच्या कविता इतक्या साध्या असूनही दोन ओळींमधे खूप काही दडलेलं असतं. पण त्या दिवशी तुमच्या आवाजात मी जेव्हा  गाणी एकली तेव्हा कळालं की "आयुष्यावर बोलू काही" च्या यशात तुमच्या दोघांचा पण सारखाच वाटा आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुम्ही जाहीर केला की हा तुमचा 775 वा भाग आहे. ह्या यशा मागचं खर कारण म्हणजे प्रत्येक कार्यक्रमातील वेगळेपणा. जसं तुम्ही सांगता की पहिल्या ३ कार्यक्रमांनंतर तुम्ही यादी बनवणं सोडून दिलं तेच. प्रत्येक वेळी श्रोत्यांना तुम्ही काही तरी नवीन देता तुमचा हा प्रवास उल्लेखनीय आहे. खरं सांगायच झालं तर तुम्ही मराठी संगीताला एक नवीन जीवनदान दिलयं, तुमच्या मुळेच युवा पिढी पुन्हा मराठीकडे वळतेय.

संगीताचा अन्  पुस्तकांचा रसिक असल्यामुळे मला तुम्हा दोघांना भेटायची इच्छा होती अन् ती पण तुम्ही पूर्ण केली..शिवाय AUTOGRAPH ही दिले. त्याबद्दल धन्यवाद. तुमचा हा "सामाजिक बांधिलकीचा" हा प्रवास असाच चालू रहो त्यासाठी तुम्हाला मन पूर्वक शुभेच्छा. आशा करतो की आपली पुन्हा भेट होवो तेही
1000 व्या कार्यक्रमात.

तुमच्या असंख्य चाहत्यांपैकी एक.


P.S.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की 
कसली

सामाजिक बांधीलकी ?
त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर कार्यक्रमात मुलं ,जोडपी ,व्रुद्ध माणसं सर्वच येतात पण  एक मुलगा ज्याला आपल्या भावना तिला सांगायच्या असतात तो एके दिवशी तिला घेऊन कार्यक्रमाला हजेरी लावतो अन् नेमकी जेव्हा प्रेमाची कविता येते तेव्हा तो हळूच तिला कोपर लावून आपल्या भावना व्यक्त करतो.
 मग हळू हळू त्यांची जागा मागे सरकत जाते नंतर ते दोघ्र गायबाच होतात .मग ते दिसतात ते  'अग्गोबाई ढग्गोबाई' च्या शो ला आपल्या लहान ग्याला घेउन. असा हा सामाजिक बांधीलकीचा अनोखा प्रयत्न .
No comments:

Post a Comment